महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? शरद पवार म्हणाले

“दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच चर्चा रंगली.

त्यातच, मुख्यमंत्री सध्या साताऱ्यात असल्याने ते नाराज होऊन साताऱ्यात गेले असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी केलेला गौप्यस्फोट खरा ठरतोय की काय अशी शंका राजकीय वर्तुळातून उपस्थित केली जात आहे.

या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांना थोडक्यात पण स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्ली सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे, याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला.

त्यावर शरद पवार म्हणाले की, “मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही. असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.”

Leave a Comment