मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपीडा नाही.
मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मन आनंदी व आशावादी राहील.
कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
वृश्चिक : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.
