अहमदनगर ब्रेकिंग! वीज कोसळून चिमुकला ठार

नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवार (दि.28) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या वीजेच्या कडकडाटात म्हसले येथे वीज पडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसासाने हजेरी लावलेली होती.

म्हसले गावात वीजेचा कडकडाट झालेला असतांना मक्तापूर पाटाच्या बाजूला असलेल्या म्हसले परिसरात साई राजेंद्र शिरसाठ (वय 10) या चिमुकल्याच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली.

Leave a Comment