बिग ब्रेकिंग! आता कॉंग्रेस – ठाकरेंचा महापौर, शिंदे – भाजपला मोठा धक्का, राजकारणात खळबळ 

भाजपला परभणीत मोठा धक्का बसला आहे. परभणीतील 65 पैकी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 25 जागा मिलाल्या आहेत. तर काँग्रेस आणि भाजपा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला परभणीत भोपळाही फोडता आलेला नाही. तर इतरांनी 5 जागांवर विजय मिळवला आहे.

परभणीत ठाकरे आणि काँग्रेसची युती

परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी करत निवडणूक लढवली होती. आता मतदारांनी या आघाडीच्या पारड्यात सत्तेची माळ टाकली आहे. आता परभणीत काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेना ठाकरे गटाचा महापौर बसणार आहे. हा भाजपसाठी आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment