आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सुयश लाभेल.

 

कर्क : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

 

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

धनु : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Leave a Comment