कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळले पाहिजे यासाठी घेतले गेलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर होते. त्यामुळे सत्तेत आलेले सध्याचे महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस यांचे सरकारच बेकायदेशीर असून या बेकायदेशीर आलेल्या सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या जोरावरती मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकाला नंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ बाळासाहेब थोरात म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाविकासआघाडी सरकारच्या काळात ते सरकार पाडण्यास राज्यपाल यांचे निर्णय , विधानसभा अध्यक्ष यांचे निर्णय ,फुटीर गटाचा व्हीप हे सर्व बेकायदेशीर होते. सत्तेसाठी कोणत्याही पद्धतीने हे सरकार पाडण्याचा तो प्रयत होता. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर हे सरकार नसल्याचे टीका त्यांनी केली
कोणीही फोडाफोडी करू नये. या साठी पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला होता विधानसभेचे अध्यक्षपद हे कोण त्याही पक्षाशी निगडित नसून ते स्वायत्त असतो त्यामुळे शिवसेना पक्षामधून फुटलेल्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी आता नि:पक्षपातीपणे निर्णय घेणे गरजेचे असल्याची आमदार थोरात यांनी सांगितले
महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला असता आणि त्यामध्येतेजर हारले असते तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले असते. त्यामुळे सत्यता काय आहे ती सर्वांना कळते आहे. सर्वोच्च न्यायाल याचा झालेला निर्णय हा शिंदे सरकारला अनुकूल नाही. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन इतिहास घडवावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली
आगामी काळात महाविकास आघाडी एकत्र राहून भक्कमपणे काम करेल असा विश्वास व्यक्त करताना जनतेमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. भाजप आणि शिवसेनेतून वेगळा झालेला गट याबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल असा विश्वासही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
