ब्रेकिंग! साकूरजवळ अज्ञात वाहनाची स्कूटीला धडक, एक जागीच ठार

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूरफाटा – साकूर राज्यमहामार्गावर अज्ञात वाहनाने स्कूटीला जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात प्रताप विजय माने ( वय ३६ ) रा. राजापूर ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, साकूरफाट्याहून साकूरकडे स्कूटीवर प्रताप माने हे जात होते. यावेळी एस आर पेट्रोलपंपाजवळ प्रताप माने आले असता साकूरफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत प्रताप माने हे रस्त्याच्या कडेला स्कूटीसह पडले. धडकेत माने हे गंभीर जखमी झाले होते.

यावेळी काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत प्रताप माने यांना साकूरमधील डॉ. पवन खेमनर यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये रूग्णवाहिकेतून तातडीने हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच माने यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment