संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने झाला. तसेच जयंतीनिमित्त भागवताचार्य ज्योतीताई सोनवणे यांच जाहीर हरिकिर्तन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला.
राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यंदाच्या वर्षी युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पोलिस भरती, पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या व दहावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानचे किरण उर्फ बापू धुळगंड, हरिभाऊ धुळगंड, चांगदेव धुळगंड, दिनकर धुळगंड, दत्तात्रय डोमाळे, सुनील खेमनर, प्रकाश धुळगंड, ज्ञानदेव बाचकर, दीपक झीटे यांनी परिश्रम घेतले.
