राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच निधन, राजकीय वर्तुळात शोककळा 

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जालिंदर कामठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

काल सायंकाळी नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर जालिंदर कामठे आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे ते सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी उठतात, परंतु आज सकाळी सहा वाजून गेले तरी ते उठले नाहीत. बराच वेळ झाला तरी खोलीतून काहीच हालचाल होत नसल्याने कुटुंबीयांना संशय आला.

अखेर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास काळजीपोटी कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जालिंदर कामठे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव असून आज सायंकाळी कोंढवा स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Leave a Comment