नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आज कळवणच्या पिळकोस फाट्यावर भयानक घटना घडली आहे. भरधाव मॅक्स गाडीने बाईकला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिनेश गावित आणि कीर्ती गावित अशी या मृत नवरा बायकोची नाव आहेत. या दोघांच नुकतच मे महिन्यात लग्न पार पडलं होत आणि संसार सुरु झाला होता पण तो अर्ध्यातच मोडला आहे. या घटनेने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गावित आणि कीर्ती गावित आणि त्यांच्यासोबत असलेली त्रिशा गावित हे तिघेही दुचाकीवरून नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात होते. या दरम्यान कळवणच्या पिळकोस फाट्यावर भरधाव मॅक्स गाडीने बाईकला भीषण धडक दिली होती. या धडकेत मोठा अपघात झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर जखमी झालेल्या दिनेश गावित आणि कीर्ती गावित आणि त्रिशाला कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. या दरम्यान उपचारा दरम्यान दोघा नवरा बायकोचा मृत्यू झाला तर त्रिशा गावीत ही गंभीर जखमी झाली होती.त्यामुळे तिच्यावर उपचार सूरू आहेत.
धक्कादायक म्हणजे दिनेश आणि कीर्तीचे मे महिन्यात लग्न झाले होते.त्यामुळे दोघांच्या संसाराला नुकतीच सुरुवात झाली होती. पण या घटनेने तो अवघ्या 2 महिन्यातच मोडला आहे.कीर्ती गावित अभोणा येथे शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. तर दिनेश जलसंपदा विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली. या घटनेने गावित कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
