BREKING! प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात

मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैकचा अपघात झाला आहे. सुदैवाने ती थोडक्यात बचावली आहे. मात्र तिच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने ट्वीट करत अपघाताची माहिती दिली आहे.

अभिनव शुक्लाने चालकावर संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “आज आमच्यासोबत घडले आहे. उद्या तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो हसत उभा होता. सविस्तर नंतर सांगेल. रुबिना कारमध्येच होती. आता तिची प्रकृती ठीक असून तिला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे.”

यावेळी त्याने मुंबई पोलिसांना चालकावर कठोर कारवाई करण्याची विनंती देखील केली आहे. यासोबतच त्याने एक अपघात झालेल्या गाडीचा देखील फोटो शेअर केला आहे.

यात तिच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. रुबिनाच्या अपघाताची बातमी मिळल्याने तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे रुबिनाच्या पतीन तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

Leave a Comment