रात्रीच्या वेळी महिला घराकडे येताना अचानक ‘तो’ आला अन….

अहमदनगर – रात्रीच्या वेळेस फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरण्यात आले. शहरातील सारडा महाविद्यालयाच्या पाठीमागे कवडेनगरमध्ये मंगळवारी (दि. 20) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मनिषा गणेश सोनवणे (वय 39 रा. कवडेनगर, सारडा महाविद्यालयाच्या मागे) या रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जाऊ आशा समवेत फिरण्यासाठी गेल्या होत्या. ओमसाई बेकरीकडून पुन्हा घराकडे येत होत्या. त्यावेळेस एक तरूण तोंडाला रूमाल बांधून रस्त्याने जात होता.

त्याने पाठीमागे वळून गळ्यातील 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून घेतले. त्याचा पाठलाग गेला असता, बालिकाश्रम रस्त्यावरील सोहम किराणा दुकानाजवळ असलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवर थांबलेल्या तरूणाच्या दुचाकीवर बसून बालिकाश्रम शाळेच्या दिशेने पळून गेला. मनिषा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Comment