टाकळी ढोकेश्वर येथील ‘या’ कार्यकर्त्यांचा BRS पक्षात प्रवेश

पारनेर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी कामगार दलित आदिवासी यांच्या हिताच्या साडेचारशे कल्याणकारी योजना राबवत तेलंगणातील शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध केला आहे. या कार्याने प्रेरित होऊन पारनेर मध्ये अनेक जण भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

त्यामुळे बीआरएस पक्ष कुठेतरी आता पारनेर तालुक्यामध्ये हळूहळू पाय रोवताना दिसत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे विचार आणि तेलंगणातील काम हे तालुक्यातील जनतेपर्यंत घरोघरी जाऊन पोहोचवण्याचे काम भारत राष्ट्र समितीचे (BRS) समन्वयक संतोष वाडेकर हे करत आहेत.

के चंद्रशेखर राव यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी समन्वयक संतोष वाडेकर यांच्या उपस्थित सचिन बांडे, गणेश झावरे, संतोष दाते, बंडूशेठ  रांधवन,योगेश रोकडे, सुधीर पायमोडे, सोमनाथ बांडे, अरुण वाबळे, यांनी बीआरएस पक्षांमध्ये प्रवेश केला.

लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले

Leave a Comment