Ahmednagar : भरधाव मालट्रकने चिमुकलीला चिरडले

Ahmednagar : भरधाव मालट्रकने आजीबरोबर रस्त्याने पायी चाललेल्या तीन वर्षांच्या बालिकेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना नगर तालुक्यातील पांगरमलच्या शिवारात पांढरीपूल ते मिरी रस्त्यावर गुरुवारी (दि.2) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. आराध्या योगेश जाधव (वय 3) असे मयत बालिकेचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक गणेश कावरे यांनी फिर्याद दिली आहे.

आराध्या ही गुरुवारी (दि.2) सायंकाळी 5 च्या सुमारास शेतातून घराकडे आजीबरोबर रस्त्याने पायी चालली होती. त्यावेळी मिरीकडून पांढरीपूलच्या दिशेने भरधाव चाललेल्या मालट्रकने (क्र.एमएच 14 एएस 9795) तिला जोराची धडक दिली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Comment