मोदींच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे ‘हे’ मंत्री होण्याची शक्यता….

शिंदे गट भाजपमध्ये सामील झालाय त्याला एक वर्षे झालं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षातील काही नेत्यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रतापराव जाधव यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भावना गवळी यांचं सुध्दा नाव चर्चेत आहे.

महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भाजपमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना आश्वासन देण्यात आलं आहे की, त्यांच्यासोबत असलेल्या एका नेत्याला केंद्रीय मंत्रीमंडळात संधी देण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्या गटात असलेल्या प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद मिळू शकते. प्रफुल्ल पटेल आता राज्यसभेचे खासदार आहेत. याआधी ते यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. मागच्या महिन्यात शरद पवार यांनी पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं होतं.

Leave a Comment