बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले 

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी (१५ जुलै) नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे आमच्याकडे २१० आमदार आहेत. ही मागणी हास्यास्पद आहे. मंत्री राहिलेला माणसाने सत्ताधाऱ्यांकडे २१० आमदारांचं संख्याबळ असताना राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं हास्यस्पद आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं.”

Leave a Comment