राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटून बाहेर पडल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. अशाच प्रकारे एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर?
या प्रश्नाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारलेल्या या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं. “माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वगैरे विषयच नाही.
ते येऊच शकत नाही. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव ठाऊक आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजे बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
