तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. आजपासून १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ९९.७५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
दिल्ली १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १६८० रुपये असणार आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच गॅसच्या वाढत्या किमतीपासून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये घट झाली आहे.
आजपासून (दि.१) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ९९.७५ रूपयांनी कमी केली. परंतु घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत.
