Ahmednagar : नगर जिल्ह्यात आज सोमवार ते बुधवार पर्यंत पावसाची चिन्हे आहेत. येत्या 8 मार्च पर्यंत पावसाचे वातावरण असेल. त्यानंतर पुन्हा पाच दिवस हवामान कोरडे असेल. 14 मार्चला पुन्हा पावसाचे वातावरण तयार होईल. 18 पर्यंत हे वातावरण तयार होईल. त्यामुळे अलिकडेच शेतकर्यांनी 9 ते 13 मार्च पर्यंत गहु काढून घ्यावा. अगदी आज सोमवारी 4 वाजेपर्यंत गहु, हरभरा काढून ठेवावा. न काढल्यास झाकुन तरी ठेवावा. कारण 20 मार्च पर्यंत खराबच वातावरण आहे.
