मानहानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर काँगेस नेते राहुल गांधी यांना आज ( दि.७) लोकसभा सचिवालयाने पुन्हा खासदारकी बहाल केली. लाेकसभा सचिवालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दाेन वर्षांची शिक्षा सुनावली हाेती. या निकालानंतर मार्च २०२३ मध्ये त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली हाेती.
न्यायालयाचा निर्णय वाचून झाल्यानंतर लोकसभा सचिवालय यासंदर्भातील कारवाई करते. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यासंदर्भात दिलेल्या आदेशाची प्रत आज तपासली गेली.
यानंतर लाेकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्याबाबतची अधिसूचना जारी केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
