16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत नगर जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल. ज्या वर्षी पुर्वेकडून पाऊस येतो, त्यावेळी उत्तर महाराष्ट्रात उशीरा पाऊस पडतो.
परतीचा पाऊस चांगला होतो, उशीरा 24 जूनला आलेला पाऊस 24 आक्टोबर ला जाईल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते. येत्या तीन महिन्याचा अंदाज व्यक्त करताना डख म्हणाले, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालखंडात पाऊस पडेल. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, 15 आक्टोबर ते 30 आक्टोबर या कालखंडात पाऊस पडेल. यंदा दिवाळीतही पाऊस पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. थंडी 26 आक्टोबर पासुन पडेल.
