आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा दावा एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट फोडून नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणाविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, हा सर्व्हे करताना ४८ मतदारसंघात जाऊन तेथील सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी सुरु केली आहे.
राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करु. भाजपला सर्व पातळ्यांवरुन उखडून फेकायचे आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले
