Sangamner : विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने सोमवारी रात्री साकूरसह संपूर्ण परिसरात थैमान घातले. रात्री साडेआठ वाजेनंतर साकूरसह परिसर अवकाळी पावसाने झोडपून काढला.
दरम्यान, वादळी वाऱ्याने कौठेमलकापूर येथील गावठाणात संजय संभाजी बागुल यांचे रमाई योजने अंतर्गत काम चालू असलेल्या घरकुलाच्या पुढची व मागची भिंत भूईसपाट झाली आहे.
जवळपास ७ फुट भिंतींचे काम झाले होते. तसेच घरकुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले होते. परंतु सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने घराच्या भिंती कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे.
तसेच परिसरातील मका, गहू, कांदा, हरभरा आदि पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
