मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ‘एवढी’ कपात

Gas Cylinder Price: स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाला आहे.

आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.

19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी एलपीजीच्या किंमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या (OMC) मते, आता LPG ग्राहकांना नवी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरसाठी 1,522 रुपये मोजावे लागतील.

कोलकात्यात 19 किलो एलपीजी गॅसची किंमत 1,636 रुपये, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,482 रुपये आणि चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,695 रुपये झाली आहे.

Leave a Comment