नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ ; ठाकरे गटाकडून ‘हे’ नाव चर्चेत

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. देशभरात राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सेनेचा खासदार निवडून आणावा यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आग्रही आहेत.

उमेदवारीबाबत पक्षात चाचपणी वेगात आहे. सध्या यासाठी ठाकरे गटात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव चर्चेत आहे. दक्षिण मतदारसंघात राजकीय लढाईची परंपरा लक्षात घेता गडाख कुटुंबातून उमेदवार असावा, असा आग्रह काहींनी ठाकरेंकडे धरल्याचे समजते.

आघाडीतील घटक पक्षाच्या एका मातब्बर नेत्याने ठाकरे सेनेच्या थिंकटँककडे गडाखांचे नाव सुचवले. ‘नगर दक्षिण आणि गडाख’ यासंर्भात विस्तृत माहिती त्यांनी दिल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment