नाहीतर मंत्रालय उडवून देऊ.. अहमदनगरचा तरूण ताब्यात 

मुंबईत मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून द्या नाहीतर मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन गुरुवारी आल्याने मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीला मंत्रालय सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढले आहे.

तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो शेवंगाव तालुक्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे(वय 34) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक चौकशीत तो स्पर्धा परीक्षा देत असून परीक्षा पारदर्शक व्हावी या साठी त्याला मुख्यमंत्र्यांशी थेट बोलायचे होते. मात्र प्रयत्न करून हा संपर्क करू न दिल्याने त्याने नगरच्या पोलीस हेल्प लाईन नंबरवर मंत्रालयात बॉम्ब असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस या तरुणाकडून सखोल चौकशी करत असल्याचे समजते.

यानंतर नगर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर शेवगाव तालुक्यातील बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे याने हा निनावी धमकीचा फोन केल्याचे पुढे आले

Leave a Comment