मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहे. दरम्यान, जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांनी देखील आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे.
कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीजवळ कुटुंबियांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची झळ संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पोहचली आहे. जालना येथील घटनेननंतर आंदोलन आंदोलन, रास्ता रोको करण्यात आले. अजूनही अनेक भागांत मराठा आंदोलकांकडून आंदोलने सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या कुटुंबीयांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला असून निर्भयाच्या समाधीजवळ कुटुंबियांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.
चार दिवसांत मराठवाड्यासह मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधी समोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील निर्भयाच्या कुटुंबियांनी दिला आहे.
