कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा, नगरसह राज्यातील…..

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकर्‍याला दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीत बटन दाबून वितरित केला जाणार आहे. प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतून तीन लाख शेतकर्‍यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. काही शेतकर्‍यानी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. याचा लाभ नगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकर्‍यांना होणार आहे.

पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 465 कोटी रुपये एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. तर उर्वरीत अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

कांदा अनुदानासाठी 10 कोटींपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

कांदा अनुदानासाठी 10 कोटींपेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंत सर्वांना अनुदान जमा होईल.

ज्या शेतकर्‍यांची 10 हजार रुपयांपर्यंतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. ज्या लाभार्थींचे देयक 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत, त्या लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.

Leave a Comment