उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. बाप्पाच्या आगमनाआधी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार वारे वाहात असून मुसळधार पाऊस सुरू आहे.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे दोन ते तीन तास मुंबईसह उपनगर आणि ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उपनगरात धो धो पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे घराबाहेर पडताना पूर्ण फोन चार्ज करुन बाहेर पडा. छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडा.
