Kopardi : कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे सात वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला.
राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येरवडा कारागृहातील बराकीत गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली आहे. या आरोपीला न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आज पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हे निदर्शनास आहे. यानंतर येरवडा पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे. सकाळी 6 वाजत बराखी खुल्या केल्या जातात आणि नंतर 10 वाजता बंद करण्यात येतात. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारागृह अधिक्षकांच्या हे निदर्शनास आणून दिले.
