राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होत आहे. राज्यात पावसाचा हा जोर अजून कायम राहणार आहे. १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
तसेच आगामी चार आठवडे पाऊस कायम असणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुटीवर असलेला पाऊस आपली सरासरी पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे.
आता कुठे मिळाला अलर्ट
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईला यलो अलर्ट असला तरी ठाणे जिल्ह्याला कोणताही अलर्ट दिला नाही.
मध्ये महाराष्ट्रातील नगर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह कोकणातही यलो अलर्ट दिला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, जालना या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिला नाही. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.
