चांदवड तालुक्यातील (Chandwad) नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील नाशिक-चांदवड महामार्गावर आज सोमवार (दि.१८) रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. ते नाशिककडून धुळे येथे चालले होते. त्यावेळी त्यांच्या कारचा चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रासमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाला होता.
यावेळी अपघातात कारमधील कृष्णाकांत चिंधा माळी (रा. राम मंदिरजवळ, मु.पो. मोघन, ता.जि. धुळे) अनिल विष्णू पाटील, (रा.अवधान, धुळे) प्रवीण मधुकर पवार, (रा.अवधान, धुळे) यांच्यासह धुळ्यातील भाजपचे (BJP) नगरसेवक किरण हरीचंद्र अहिरराव यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरक्षा चुराडा झाला आहे.
