राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, शासनाचा महत्वाचा निर्णय 

राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिलीय. सरकारनं शुक्रवार २९ सप्टेंबरला सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद गुरुवारी २८ तारखेला साजरी केले जाणार आहेत.

या उत्सवादरम्यान गर्दी आणि मिरवणुकीच्या व्यवस्थांचे कार्यक्षम व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवारी सरकारनं सुट्टी जाहीर केलीय. राज्यात शांततेचे वातावरण असावे.

गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे, म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती भारतीय खिलाफत समितीच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. भारतीय खिलाफत समितीच्या शिष्टमंडळानं या संदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने पोलीस प्रशासनावर बराच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून ईद- ए- मिलादच्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस दुसऱ्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर २९ रोजी काढण्यात येणार आहे.

ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी जुलूस ही एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या या निर्णयामुळे मुंबई पोलिसांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Leave a Comment