नैऋत्य मान्सूनने उत्तरेकडील राज्यातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. त्यापूर्वी देशातील अनेक राज्यात मान्सून जोरदार कोसळत आहे.
दरम्यान पुढील दोन दिवस (१, २ ऑक्टोबर) कोकणासह लगतच्या भागात हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती पुणे विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे.
