मंत्री विखेंनी बाळासाहेब थोरातांना सुनावले खडेबोल 

आमची संस्कृती ही दिवे लावण्याची आहे. दिवे बंद करण्याची नाही, त्यामुळे त्यांना काय वाटते, हस्तक्षेप होतो काय? त्याच्याशी काय कर्तव्य नाही. केंद्रात भाजप सरकार आहे.

राज्यात भाजप सरकार आहे, त्यामुळे रस्त्याचे उद्घाटन आपण करणार, त्यामुळे कुणाला काय वाटते याची आम्हाला चिंता नाही, असे खडेबोल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांना सुनावले.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर ना. विखे पाटील आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

ना. विखे पाटील म्हणाले, थोरातांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण फुकटचे श्रेय लाटण्याची पद्धत या संगमनेर तालुक्यात जुनीच आहे. वास्तविक संगमनेर चे रस्त्याचे काम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झाले.

या रस्त्यावर जे पथदिवे लावण्यात आले ते काम देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण ते उद्घाटन करावे, त्यात आपण कुठेही हस्तक्षेप केला नाही.

Leave a Comment