राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास मंजुरी मिळाली आहे. योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता मिळाली आहे.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी आता 6 हजार रुपये मिळणार आहे.
एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना घोषणा केली होती.
केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 12 हजारांचा निधी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होतो. केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारचा ही लाभ मिळणार आहे.
