मोठी बातमी! राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे गटात खळबळ…

ठाकरे गटात परतण्यासाठी शिंदेगटातील अनेकांचे मातोश्रीवर फोन आणि निरोप येत आहेत. लोकसभेपूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

विनायक राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मात्र विनायक राऊत यांचे सर्व दावे हाणून पाडले आहेत. कुणी कितीही स्वप्न स्वप्न बघितली, तरी निवडणुकीनंतर सर्व देश मोदीमय होईल, असं विधान देखील उदय सामंत यांनी केलं आहे.

 

विनायक राऊत काय म्हणाले?

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतील गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना शहाणपण शिकवू नये, २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

 

‘राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार’

मराठा आणि ओबीसी यांच्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. त्यांना दोन्ही समाज धडा शिकवेल, अशी टीकाही राऊत यांनी केली. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्यांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. लोकसभेपूर्वी शिवसेनेत मोठा भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.

शिंदे गटाच्या १३ खासदारांपैकी केवळ तीन जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आमच्यासमोर आली आहे. त्यामुळे काही जणांचे मातोश्रीवर फोन सुरू झाले असून अजूनही काही जण निरोप पाठवत आहेत. आमचं चुकलं असं सांगून परत येण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गौप्यस्फोट देखील विनायक राऊत यांनी केला आहे.

 

उदय सामंत यांना फेटाळला दावा

दरम्यान, विनायक राऊत यांचा दावा उदय सामंत यांना हाणून पाडला. कुणी कितीही दिवा स्वप्न बघितली. तरी सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीनंतर पूर्ण देश हा मोदीमय तसेच भाजपमय झालेला असेल. आमचे आमदार-खासदार त्यांच्या (ठाकरे गटाच्या) संपर्कात असण्यापेक्षा जे शिवसेनेचे नेते म्हणून जाहीर झालेले आहेत. त्यातील काहीजण एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, असं उदय सामंत म्हणाले.

Leave a Comment