संगमनेर – साकूर येथील ४ हजार ५१४ सभासद शेतकऱ्यांना दिवाळीच मोठ गिफ्ट  

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील ४ हजार ५१४ सभासद शेतकऱ्यांची यंदा दिवाळी गोड होणार आहे. कारण नुकतेच साकूर येथील सोसायटीच्या सभागृहात दिवाळी निमित्त सभासदांना लाभांश वाटपाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली व सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर व मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय.

यावेळी कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जन कल्याण शिक्षक संस्थेचे संस्थापक लहानू खेमनर हे होते. तर व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर, सरपंच सचिन सोनवणे, मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड, ग्रामसेवक राजेश पाबळे, अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस ॲड. अशोक हजारे, अनमोल खेमनर, दादाभाऊ लोंढे, रफिक चौगुले, दादाभाऊ खेमनर, महादू कुदनर आदि मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली साकूर येथील सर्वच सहकारी संस्थावर वर्चस्व आहे. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, मुळा खोरे पतसंस्था व विरभद्र मुळाखोरे दुध संस्थेचा कारभार देखील अविरतपणे उत्कृष्ट सुरू आहे. दरवर्षी या तिन्ही संस्थेच्या सभासदांना दिवाळीनिमित्त बोनससह लाभांश वाटप करण्यात येत असतो.

यंदाही मुळाखोरे पतसंस्थेच्या १०४४ व विरभद्र दूध संस्थेच्या १०७८ दूध उत्पादक सभासदांना १३ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आला. तसेच जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या साकूर सोसायटीने सलग तिसऱ्या वर्षी २३९२ सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप केलाय. यासोबतच मुळाखोरे पतसंस्था व विरभद्र दूध संस्थेने सभासदांना दिवाळी बोनस म्हणून २ किलो साखर, एक मोती साबण वाटप केलाय. त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांचा जनता अपघात विमा उतरविला जाणार आहे.

यावेळी सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर म्हणाले की, साकूर येथील सर्वच संस्थाचे कारभार उत्कृष्ट सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीमुळेच संस्थाना नफा झाला आहे. साकूर सोसायटीने सलग तिसऱ्या वर्षी २३९२ सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप केलाय. सोसायटीचे कर्जदार वेळेत कर्ज देखील भरत आहे. त्यामुळे याचा फायदा सोसायटीला होत आहे. तसेच १ लाख ४० हजार रूपयांचा विमा देखील उतरविला जाणार आहे. तिन्ही संस्थाचे काम स्वच्छ प्रतिमेचे असून घरातील संस्था म्हणून कारभाराकडे आपण पाहत आहे. कारण काटकसरीने या संस्था काम करत आहेत. संस्थांनी लाभांश वाटला तरच चांगल काम दिसत. अनेक संस्था बुडालेल्या आपण बघितल्या परंतु तिन्ही संस्थेंनी चांगल नाव कमविले आहे.

सभापती शंकर खेमनर म्हणाले की, संस्थांच काम चांगलं आहे. तसेच यशस्वी वाटचाल सुरू आहे. साकुर सोसायटीने तालुक्यात सर्वात जास्त कर्जवाटप केले आहे. तसेच वसुली सुद्धा ९० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे लाभांश वाटप करण्यात येत आहे. सोसायटीने १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली आहे. तसेच मुळाखोरे पतसंस्था देखील अतिशय काळजीपूर्वक कर्ज वाटप करून वसुली करत आहे. पतसंस्थेने महिला बचत गटांना देखील जवळपास ६० लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. तसेच विरभद्र दूध संस्थेकडे ६० ते ६५ लाख ठेवी आहे. ५८ लाख रुपये संस्थेचे शेअर्स राजहंस दूध संघाकडे आहे. संस्थेची स्थिती चांगली आहे.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण मिसाळ यांनी केले तर प्रास्ताविक विठुराज मैड व आभार रमेश पेंडभाजे यांनी मान

यावेळी व्हा. चेअरमन, सचिव, संचालक, सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment