संगमनेर(DSNews24/किरण पुरी) नाशिक – पुणे महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार्तिकी वारीसाठी शिर्डीहून देवाची आळंदीकडे साईबाबा पालखी सोहळा हरिनामाच्या गजरात नाशिक – पुणे महामार्गावरून मार्गस्थ होताना भरधाव कंटेनर पाठिमागून थेट पालखीत घुसल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील १९ मैलावर घडलीय.
अचानक भरधाव कंटेनर दिंडीत घुसल्याने वारकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात 4 वारकरी ठार तर 9 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. तर
जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
