तुळशी विवाहानंतर लग्नकार्याला सुरवात होते. यंदा वर्ष २०२३ मध्ये २३ नोव्हेंबरला प्रबोधनी एकादशीनंतर २४ नोव्हेंबरला तुळशी विवाहारंभ झाला आणि यानंतर लग्नकार्यालाही सुरवात झाली. वर्ष २०२३ आता संपण्यात असून, नवीन वर्ष २०२४ मध्ये किती विवाह मुहूर्त असतील आणि कधी सनई चौघुडे बंद राहतील ते जाणून घेऊया.
विवाह हा मानवी जीवनातील एक महत्वाचा संस्कार आणि टप्पा आहे. विवाह करताना दोन कुटूंबे आणि दोन आत्मे एकत्र येत असतात असे म्हटले जाते. विवाहाला हिंदू धर्मात फार महत्व दिले जाते आणि विवाह हा शुभ मुहूर्तावर व्हावा अशी सर्वांची इच्छा असते. वर्ष २०२३ संपण्यात असून, आता येत्या वर्षात लग्नकार्यासाठी किती मुहूर्त आहे हे सर्वांना पाहायचे असतात.
काहींना उन्हाळ्यात, काहींना पावसाळ्यात तर काहींना हिवाळ्यात लग्नकार्य व्हावे अशी प्रत्येकाला आपआपल्या आवडीनुसार इच्छा असते. परंतू वर्ष २०२४ मध्ये उन्हाळ्यात विवाहाला मुहूर्त नाहीत. कारण मे आणि जून मध्ये शुक्र ग्रह अस्त होणार आहे, शुक्र ग्रहाच्या उदयानंतर जुलै मध्ये लग्नकार्याला मुहूर्त मिळतील.
जेव्हा सूर्य गुरूच्या धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास असतो. खरमासाचे दिवस अशुभ काळ म्हणून गणले जातात, त्यामुळे लग्न, मुंडन, गृहप्रवेश यासारख्या गोष्टींना शुभ मुहूर्त मिळत नाहीत. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला शनिवार १६ डिसेंबर २०२३ ला धनु मलमास सुरू होईल. तर १४ जानेवारी पौष शुक्ल तृतीये पर्यंत राहील. यानंतर पुन्हा लग्नकार्य सुरू होऊन जातील.
विवाह मुहूर्तासाठी गुरू आणि शुक्र अस्तचा विचार केला जातो. कारण शुक्र हा वैवाहिक, भौतीक सुखाचा आणि प्रेमाचा कारक आहे, तर गुरू मुलींसाठी पतीसुखाचा कारक मानला जातो. दोघं ग्रह उदीत असतील तर विवाह मुहूर्त मिळतात, त्यामुळे शुक्र आणि गुरू ग्रहाचे उदीत राहणे गरजेचे आहे. जर हे दोन्ही ग्रह अस्त असतील तर तेव्हा लग्नकार्य होत नाही. २३ एप्रिल २०२४ ला शुक्र ग्रह दुपारी अस्त होईल, जो २९ जून पर्यंत अस्त राहील, तर ६ मे ला गुरु ग्रह देखील अस्त होईल, जो २ जून रोजी उदित होईल. परंतू शुक्र ग्रह अस्तच राहील यामुळे मे आणि जून मध्ये लग्नकार्यासाठी मुहूर्त नाहीत.
वर्ष २०२४ मध्ये लग्नकार्यासाठी मुहूर्त-
जानेवारी २०२४ – १६, १७, २०, २१, २२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी २०२४ – ४, ५, ६, ७, ८, १२, १३, १४, १८, १९, २४, २५, २६, २९
मार्च २०२४ – १, २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११, १२
एप्रिल २०२४ – १८, २०, २१, २२, २३, २४, २६, २८, २९
मे २०२४ – १, ५, ९, १०, १९, २०, २६, २७
जून २०२४ – २, ३, १२, १३, १६, १९, २०, २८
जुलै २०२४ – ११, १३, १४, १५
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२४ या महिन्यात लग्नाच्या तारखा नाहीत.
नोव्हेंबर २०२४ – १२, १६, १७, १८,२४, २५, २७
डिसेंबर २०२४ – २, ४, ५, ९, १०, ११, १४
