मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर जहरी टीका, म्हणाले बुजगावण अन् डबडा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज बीड जिल्ह्यात विराट सभा पार पडत आहे. मराठा आरक्षणासाठी उद्या म्हणजे 24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपत आहे.

त्यामुळे जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्व मराठा समाजाचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, आपल्या भाषणातून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, येवल्याचं येडपाट येडं सगळ्या दुनियाचं याडं आहे. बावचाळे कुठलं, याने याच्या पाहुण्याचं जाळलं. त्याला काही दिसेना, नुसत्या पिशीच घेऊन फिरतो, बघा मला कशा शिव्या देतात. आता पिशी घेऊन फिरतो, उद्या केळाची सालं आणि सालपाटं घेऊन फिरावं लागणार आहे. मी लय बेकार आहे. तुला आताच खालल्ले पचणं, आता कसा बारीक आवाजात बोलतो.

आता जरांगे साहेब बोलतो. पहिल्या दिवशी नीट बोलला असता तर आज थोडी वेळ आली असती. दिसतो कसा, रंगनाथ रंग बदलणारा, याचा रंग्या…गप्प मरायचं. मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, तुम्ही बोलू नका, आम्ही भुजबळांना समज दिली. मी काही बोललो नाही.

मग लगेच बोलायला लागा. येडपट बुजगावणं, माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केलं. डबडा कुठला.. एकदा मराठा आरक्षण मिळू दे मग कचकाच दाखवतो. आम्ही गप्प बसलो की काड्या करतोय मी गप्प बसलो की लगेच काड्या करायला लागतो. जर माझ्या मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर सुट्टी नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Leave a Comment