हवा तेज है, अजितराव टोपी उड जाएगी’, संजय राऊतांचा इशारा 

संजय राऊत यांनी पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकारणातील भीष्मपितामह असा उल्लेख केला. तर खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा निलंबित खासदार असा उल्लेख केला.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत निशाणा साधला. “आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जाएगी”, असा टोला राऊतांनी लगावला.

“लोकं म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं, पण त्यांनी काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं. त्यांनी निवडणूक आयोग खरेदी केले. त्यांनी महाराष्ट्रातील आमदार-खासदार खरेदी केले.

त्यामुळे हे विसरु नका, काही विकलं तर काही खरेदी केलं आहे. जे खरेदी केलं आहे त्याच्यावर तो राज्य करतोय. हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Leave a Comment