मविआचा लोकसभा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती जागा, वाचा….

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडीत कोणता पक्ष किती जागा लढणार यावरुन रस्सीखेच सुरु झालीय.

या दरम्यान, मविआचा लोकसभा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. ठाकरे गट-18, काँग्रेस-17, शरद पवार गट- 10 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

वंचितला 2 आणि राजू शेट्टींना 1 जागा मिळणार आहे. वंचितला अकोला आणि नांदेड, अमरावती किंवा हिंगोली यापैकी एक तर राजू शेट्टींसाठी हातकणंगलेची जागा सोडण्यात येणार असल्याचं समजतंय.

शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरुन या फॉर्म्युल्यावर एकदा अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.

Leave a Comment