बिग ब्रेकिंग! अहमदनगरमध्ये सुजय विखे की निलेश लंके?, ओपिनियन पोलमधून धक्कादायक निकाल…

देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल  प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये सुजय विखे की निलेश लंके?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी मोठी खेळी खेळत निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. सुजय विखे विरुध्द निलेश लंके यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यात निलेश लंके हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डॉ. सुजय विखे पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment