अजित पवार व शिंदे गटाची काय परिस्थिती? बघा ओपिनियन पोल काय सांगतो

देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस बाकी आहेत. असं असताना Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही, अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे केवळ तीन जागा आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे.

 

कुणाला किती जागा?

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. टीव्ही 9 च्या ओपिनियन पोलनुसार, भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षालाही 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानालं लागण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा दावा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात येतोय.

Leave a Comment