भाजपच्या एका नेत्याचे निधन झाले आहे. विशेष म्हणजे भाजपचे हे नेते लोकसभा निवडणूक लढवत होते. १९ एप्रिल रोजी त्यांच्या मतदारसंघात मतदान देखील झाले होते. उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद मतदारसंघातील ही घटना असून सर्वेश सिंह असं भाजप उमेदवाराचे नाव आहे. सर्वेश सिंह हे ७२ वय वर्षांचे होते. ते एकवेळा खासदार आणि पाचवेळा आमदार राहिलेले आहेत.
मतदान पार पडल्यानंतर पुढच्याच दिवशी सर्वेश सिंह यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वेश सिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. ते उपचारासाठी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पीटीआयला बोलताना सांगितलं की, सर्वेश कुमार यांचे निधन झाले आहे.
सर्वेश सिंह यांना घशासंबंधी समस्या होती, त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. ते दिल्लीच्या एम्समध्ये शनिवारी चेकअपसाठी गेले होते, अशी माहिती चौधरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी सर्वेश सिंह यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. भाजपची भरुन न निघणारी हानी झाली आहे, असं ते म्हणाले आहेत.
