बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार?, महायुतीला मोठा झटका….

आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आणले होते. या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही असाच करिश्मा करून दाखवण्याच्या तयारीत महायुती आहे.

पण आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे. तर महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातला एक खळबळ उडवून टाकणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.

विधानसभा निवडणुकीआधी सकाळ मिडीयाने एक ओपिनियन पोल केला होता. या ओपनियन पोलनूसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला? असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता. या पोलमध्ये महाराष्ट्रातील 48.7 लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. तर महायुतीला महाराष्ट्रातील 33.1 लोकांनी पसंती दिली आहे. 4.9 टक्के लोकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे. तर 13.4 टक्के लोकांनी अद्याप मतं ठरलेलं नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment