मेष – मानसिक विचलता जाणवू लागेल. गोंधळून जाऊ नका. तुमच्या सर्व कामातील अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. मदतीचे हात पुढे येतील. धंदा वाढेल.
वृषभ – संयमाने वागल्यास चूक होणार नाही. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासात नियमांचे पालन करा. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात दुर्लक्ष करून चालणार नाही.
मिथुन – अवघड कामे यशस्वीपणे पार पाडू शकाल. मनावर दडपण येईल. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. घरगुती वाद होईल. खर्च वाढेल.
कर्क – घरासंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. नव्या उपक्रमांबाबत चर्चा कराल. समारंभास हजर राहावे लागेल. मौल्यवान खरेदी करताना सावध राहा.
सिंह – मैत्रीत दुरावा येण्याचा संभव आहे. प्रवास कराल. प्रेमाला चालना मिळेल. सौम्य धोरण ठेवा. वाटाघाटीत वाद होईल. नव्या दिशेने जाण्याचा मार्ग शोधता येईल.
कन्या – शिक्षणात अपेक्षित यश संपादन करता येईल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. धंद्यात मेहनतीने चांगला लाभ पदरात पडेल. घर घेण्याचा विचार होईल.
तूळ – महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात जम बसेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नवीन ओळख होईल. प्रकृती जपा.
वृश्चिक – व्यावहारिक समीकरणे बदलण्याची शक्यता राहील. धंद्यात मेहनत घेतल्याचे समाधान मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल.
धनु – घरगुती वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. संयम व सामंजस्याने परिस्थिती हाताळा. धंद्यात सुधारणा होईल. नवा उत्साह मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल.
मकर – गाठीभेटीद्वारे कार्याला चालना मिळेल. नव्या उपक्रमांना वाव मिळेल. कोणत्याही क्षेत्रातील अंदाज घेताना घाई करू नका. चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या.
कुंभ – सामाजिक कार्यात आपण अग्रेसर राहाल. आपल्याला क्षुल्लक अडचण येईल. देवदर्शनाचा आनंद घ्याल. प्रवासात घाई करू नका. नव्या ओळखी होतील.
मीन – आपले परिश्रम सत्कारणी लागतील. आजचे काम ठरवल्याप्रमाणे करून घ्या. धंद्यात बोलताना रागाचा पारा वाढू देऊ नका. यश मिळेल. वरिष्ठांशी जुळवून घ्याल.
