विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. अशातच त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय.
जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्रानी यांच्यात बंद दाराआड चर्चा
अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी घरी जयंत पाटील दाखल झाले आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना उधान आलंय. बाबाजानी दुर्रानी अजित पवार गटाचे विद्यमान परभणी जिल्हा अध्यक्ष आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य देखील आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आहे.
