संगमनेर (DSNews24/किरण पुरी) : दिवसेंदिवस नवनवीन डिजिटल सुविधा उपलब्ध होत आहे. बरेचशे डिजिटल सुविधांचाच वापर करताना दिसत आहेत. यात बॅंकिग क्षेत्रात ग्राहकांना बऱ्याच अडीअडचणींना सामोरे जावे लागते. जलद कामे कसे होतील यासाठी अनेक जण विविध डिजिटल Online सुविधांचा वापर करताना दिसत आहेत.
एखाद्याशी किंवा स्वतःचा आर्थिक व्यवहार करायचा असेल तो तात्काळ कसा करता येईल अशीच एक खास एटीएमच्या(ATM) माध्यमातून सुविधा संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या संकल्पनेतून उपलब्ध केली आहे.
नुकताच या डिजिटल एटीएम मशीनचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर, ज्येष्ठ नेते हनुमंत खेमनर, मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड, सरपंच सचिन सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांना सर्व सुविधा युक्त मुळाखोरे पतसंस्थेने स्वतंत्र एटीएम मशीन उपलब्ध केले आहे. या मशिनद्वारे नुसतेच एटीएम कार्ड द्वारे पैसैच काढता येणार नसून स्कॅनर द्वारे फोन/ गुगल पे चा वापर करून पैसे काढता येणार आहे. तसेच एटीएम कार्ड जरी नसले तसेच आधार कार्ड द्वारेही पैसे काढता येणार आहे. तसेच एटीएम मशीन मधूनच देशातील कोणत्याही बॅंकेच्या खात्यात पैसे भरण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.
संगमनेर तालुक्यात अशी सुविधा राबविणारी मुळाखोरे पतसंस्था पहिलीच ठरली आहे. तसेच या सुविधांमुळे ग्राहकांना जलद सुविधा मिळणार आहे. बॅंकेत गर्दी असणे, इंटरनेटचा प्राॅब्लेम असणे, नंबर न लागणे, या गोष्टींमुळे अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु आता मुळाखोरे पतसंस्थेच्या या डिजिटल एटीएम मुळे साकूरसह परिसरातील नागरिकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.
